Ration aadhaar link ; राशन साठी ई-केवायसी करावी लागणार नाही तर राशन बंद होणार
Ration aadhaar link ; रेशनकार्डचे बोगस लाभार्थी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने रेशन आधारशी जोडण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख दिली होती, आता ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. (Ration news)
केंद्र सरकार वन नेशन वन रेशन योजनेअंतर्गत आधार आणि रेशन लिंक करणे अनिवार्य करत आहे. त्यामुळे मृतांच्या नावावर मिळणारे रेशन बंद करून गरजू लोकांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचवणे शक्य होणार आहे. (Big news ration card)
अनेक लाभार्थ्यांकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असून ते विविध ठिकाणांहून रेशनचा लाभ घेत आहेत. तसेच, घरातील मृत सदस्याच्या नावावर रेशन घेतले जात आहे. या सगळ्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची सक्ती केली आहे. 30/सप्टेंबरपासून आधारकार्ड आणि शिधापत्रिका धारकाच्या शिधापत्रिका लिंक न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. (Aadhaar ration news)
आधार कार्ड आणि रेशन कार्ड कसे लिंक करावे…
तुम्ही तुमच्या रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करू शकता. ही प्रक्रिया ऑनलाइनही केली जाते. जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केले नसेल तर ही प्रक्रिया 30/सप्टेंबर पूर्वी पूर्ण करा म्हणजे तुमचे रेशन बंद होणार नाही. (Aadhaar ration link updates)