Soyabin hamibhav 2024 ; सोयाबीनच्या हमीभावात फक्त 292 रूपयांची वाढ….
Soyabin hamibhav 2024 ; केंद्र सरकारने दि. 19 जून रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यासह मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत खरीप पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आले. तेलबिया कडधान्य तसेच इतर 14 पिकांचे हमीभाव जाहीर केले आहे. हमीभावात काही पिकांची वाढ केली तर काही पिकांना खुप कमी हमीभाव मिळाला आहे.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुल्य आयोगाच्या बैठकीत सोयाबीनला किमान 5100 एवढा हमीभाव मिळाला अशी मागणी केली होती. तसेच नवीन झालेले केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याने आणि मध्य प्रदेश हे सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला हमीभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन हमीभावात वाढ होण्याच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात फक्त 292 रुपयांची वाढ केली आहे. मागच्या वर्षी सोयाबीनला 4600 रूपये एवढा हमीभाव होता तक्ष यंदा त्यामध्ये 292 रूपये वाढ करुन 4892 रूपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे.