Soyabin yallo ; सोयाबीन पिवळी पडत असल्यास अशी करा उपाययोजना
Soyabin yallo ; सध्या सोयाबीन .साधारणता 20/25 दिवसाचे असुन या अवस्थेत विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडते. पिवळे पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाशसंश्लेषण क्रिया योग्य होत नाही परीणामी रोपाची चांगली वाढ होत नाही. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडत असले तर वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा उत्पादनात मोठी घट होते. तरी सोयाबीन पिवळे पडल्यास कोणते उपाय करावेत पाहुया तज्ञांचे उत्तर…
सोयाबीन पिवळी का पडते. सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे…
1) शेतात जर जास्त दिवस पाणी साचुन राहत असेल तर त्या शेतातील सोयाबीन पिवळी पडण्याची शक्यता अधिक असते…
2) पाण्याचा निचरा कमी होणारी चुनखडयुक्त जमीन असल्यास सोयाबीन पिवळी पडते..
3) जमीनीतील अन्नद्रव्यांच्या लोह, पालाश, नत्र च्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळी पडते. मात्र अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळी दिसत असल्यास पानाच्या शिरा हिरव्या राहतात.
4) तणनाशकाच्या फवारणी नंतर तणनाशकाचे औषधाच्या प्रमाण जास्त झाल्यावर सोयाबीन पिवळी पडते.
5) जमीनीतील झिंक सल्फेट च्या कमतरतेमुळे सोयाबीन मध्ये पिवळेपणा दिसतो.
सोयाबीन पिवळी पडली यावर उपाय योजना कोणत्या कराव्यात…
1) शेतात जर पाणी साचलेले असेल तर ते पाणी शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
2) 19-19-19 + मायक्रोनुट्रीएंट ची फवारणी करावी. खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर इमामेक्टिन 10gm घ्यावे..
3) झिंक सल्फेट + फेरस सल्फेट ची फवारणी करावी खोडकिडीचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन 10gm घ्यावे.
4) पिवळ्या सोयाबीनवर पांढऱ्या माशी आहे का चेक करावे.. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे. पांढऱ्या नियंत्रण साठी पोलो या फवारणी करावी.
वरील प्रमाणे उपाययोजना केल्यास व शेतात वापसा झाल्यानंतर सोयाबीन मधिल पिवळेपणा कमी होतो..