Water soluble fertilizer ; विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर, पिकाच्या अवस्थेनुसार कोणते खत केव्हा द्यावे…
Water soluble fertilizer (विद्राव्य खते) ; पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकाला सुक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. विद्राव्य खते फवारणीतुन तसेच ठिबक सिंचनाद्वारे पिकाला देता येतात. विद्राव्य खते पिकाला लवकर उपलब्ध होतात त्यामुळे त्याचा जास्त फायदा होतो. पिकाला वाढीनुसार विद्राव्य खते द्यावीत. अन्नद्रव्यांची कमतरता दिसल्यास विद्राव्य खते प्रभावी कामगिरी करतात. पिकाला वाढीनुसार कोणते खते केव्हा द्यावीत याबाबत थोडक्यात माहिती पाहुयात.
कोणत्याही पिकाच्या साधारण प्रमुख तीन अवस्था असतात पहिली वाढीच्या अवस्था दुसरी फुल धारणा, फळधारणा आणि तिसऱ्या अवस्थेत पिक परिपक्व होतात याप्रमाणे आपण विद्राव्य खते दिली पाहिजे.
1) पिकाला वाढीच्या अवस्थेत कोणकोणती विद्राव्य खते द्यावीत.
वाढीच्या अवस्थेत पिकाला 19-19-19 आणि 20-20-20 या विद्राव्य खतांचा वापर करावा. यामध्ये नत्र, स्पूरद आणि पालाश सारख्या प्रमाणात असतात याच्या पिकाच्या वाढीसाठी चांगला फायदा होतो.
2) पिकाला फुल धारणा (फळधारणा) अवस्थेत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करावा…
पिकाला फुलधारणा होण्यास सुरुवात झाल्यावर 13-00-45, 24-28-00 , 13-40-13 तसेच 12-61-00 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर करावा. या खतांचा फवारणीने फुलगळ थांबुन फळधारणा होते. फुलाच्या संख्येत वाढ होते व चांगल्या फळधारणेला अडचण येत नाही.
3) पिकाला फुलोऱ्यानंतर फळधारणा अवस्थेत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करावा..
पिकाला फुलधारणा पुर्ण झाल्यावर आणि फुलांतुन फळांकडे वाटचाल सुरू झाल्यावर 00-52-34 , 00-50-18, 00-52-38 तसेच 13-00-45 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर करावा. या खतांच्या फवारणीने फळ टपोरे व मोठे होते. फळाचा रंग चांगला होतो. सोयाबीन तुर यासारख्या पिकाचे दाणे टपोरे पडतात.
अशा पद्धतीने विद्राव्य खतांचा आपण अवश्य वापर करावा…