Weather rain updates ; या कारणामुळे मान्सून रेंगाळला पुन्हा जोरदार कधी बरसणार….
Weather rain updates ; यंदा मान्सूनने देशासह राज्यात वेळेआधीच हजेरी लावली होती. मान्सून पोहोचताच राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडला. परंतु गेल्या आठवडाभरापासून मान्सूनने पुढे प्रगती केली नाही आणि राज्यात कुठेही जोरदार व सार्वत्रिक पाऊस पडला नाही. अनेक ठिकाणी पेरणीसाठी योग्य पाऊस पडला तर काही ठिकाणी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मान्सून मागिल चार पाच दिवसापासून एकाच ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही मान्सुन दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सूनचा वेग मंदावल्याचे हवामान तज्ञांकडून सांगितले जात आहे.
मान्सून पुन्हा तीन चार दिवसांत सक्रिय होईल व पुढे सरकेल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच संपूर्ण विदर्भात पुढील पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे.
मोसमी पावसाने जवळजवळ संपूर्ण कोकण व्यापला, पण महाराष्ट्रासह इतर काही भागात अजूनही पावसाची वाट आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात तो पूर्णपणे सक्रिय होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कालावधीत मोसमी पावसाची बंगालची शाखा पूर्व भारतात पुढे सरकेल. तर त्याचवेळी मोसमी पावसाची अरबी समुद्रीय शाखादेखील सह्याद्रीच्या पूर्वेकडे प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार म्हणजेच २३ जून नंतरच राज्यात मोसमी पावसाची सक्रियता वाढेल. त्यानंतरच राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस दाखल होईल. खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते.